माझी छोटीशी डायरी - पाणी हेच जीवन
माझी छोटीशी डायरी - पाणी हेच जीवन
दिनांक - २१ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज सकाळी पहिल्यादा डायरी एवढ्या लवकर लिहायला घेतली. रोज पाणी ६.३० वाजेपर्यंत येते पण आज पाणी आलं नाही. काल खूप थोडंच पाणी मिळालं ते पण वॉशरूम वैगरे जाण्यासाठी आणि खूपच कमी पाणी जेवण बनवण्यासाठी आणि पिण्यासाठी उरले. बाजूच्या काकूंना विचारले तेव्हा समजले आज पाणी खूपच कमी येणार आहे.
कोरोनाच्या काळात पाण्याचा जास्त वापर झाला, कारण आता लोकांना सारखे हात धुवायची सवय जी लागली. पाणी नाही आलं तर आमच्या घरात खूपच टेन्शन येत. आम्ही सर्वानी तेव्हा ठरवले, आज दुपारचं जेवण बनवायचं नाही. जर जेवण बनवलं तर धुण्याकरता पाण्याचा जास्त वापर होणार. तसेच भांडी धुण्याकरता सुद्धा पाणी लागणार. तेव्हा आम्ही ठरवले, आज आम्ही कांदा-पोहे खाऊन भूक भागवणार.
जेव्हा आपल्या घरी पाणी येत नाही तेव्हाच आपल्याला पाण्याची जास्त किंमत कळते. बघा ना, पाणी आपल्यासाठी किती अनमोल आहे ते. खरंच कोणीतरी म्हटले आहे, पाणी हेच जीवन आहे.
