Sagar Bhalekar

Others

4.0  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - निसर्ग

माझी छोटीशी डायरी - निसर्ग

1 min
164


दिनांक - १८ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

 पहिले काही चांगलं लिहावंसं वाटलं की लगेच मी माझ्या डायरी मध्ये लिहीत असे. आता मी माझ्या डायरी मध्ये लिहायचं बंद केलं. आता स्टोरी मिररने डायरी काढली आहे त्यात लिहितो, माझ्या मनातल्या सर्व गोष्टी. चांगलं आहे डायरीच्या बरोबर वाचक सुद्धा जाणून घेतात माझ्या मनातल्या सर्व गोष्टी.

आज फेसबुक वर काही कवितेच्या ओळी बघितल्या…

जेवढी गरज असेल,

तेवढ्याच झाड्यानां पाणी द्या 

पक्ष्यानी सुद्धा प्रेमाने 

त्यातले पाणी पिले 

कोणी तोडला नाही विश्वास 

आकाश आणि जमीनशिवाय…

किती गहन विचारांचा असेल लेखक. निसर्गाचा वाटेल तसा लोकांनी वापर केला. एक मनुष्यच असा आहे की ज्याच्या गरजा अजूनही ह्या जमिनीवरच्या संपलेल्या नाही आहेत. त्यांची लालची वृत्ती अजून संपलेली नाही आहे. निसर्ग ही आई आहे आपली. नेहमी आपल्याला काही ना काही देतच राहिली आहे. पण निसर्गाला काय माहित की, मनुष्य एवढा लालची आहे ते. आता निसर्ग सुद्धा थकला आहे. त्याची पण देण्याची वृत्ती हळूहळू कमी होत आहे. एवढा पण माणसाने त्याचा अति गैरवापर करू नये की एक दिवस निसर्गाचा कोप होईल.  


Rate this content
Log in