माझी छोटीशी डायरी - मनातल्या गोष्टी
माझी छोटीशी डायरी - मनातल्या गोष्टी
दिनांक -: १३ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
मनातल्या गोष्टी सांगायची वेळ पुन्हा आली. काही काही गोष्टी हृदयाला एवढ्या भेदून जातात, जे कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाही. मला जर कोणाच्या गोष्टी वाईट वाटल्या असतील तरी त्या गोष्टी मी कोणापुढे उघडपणे सांगू शकत नाही. आणि त्यांच्याबरोबर एकदम सामान्य पद्धतीने व्यवहार करतो.
पण मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल राग व द्वेष निर्माण होतो. जे उत्तर मी समोर देऊ शकत नाही, ते उत्तर मी मनांमध्ये देतो. ह्यामुळे मला मानसिकरीत्या खूप त्रास होतो.
नाती जपण्यासाठी काही वेळा शांत राहावं लागत. पण मी खोटं राहून जगू शकत नाही, माझी ही खूप मोठी समस्या आहे. म्हणून जर मला त्या व्यक्तीची कोणती गोष्टी कोणाला पटली नाही, तर मी त्या व्यक्तींपासून थोडी लांबच राहते. मला आवश्यकतेपेक्षा जास्त गोड बोलणारी व्यक्ती खरंच आवडत नाही. म्हणून मी एवढं इच्छितो आयुष्यामध्ये नाती कमी असून दे पण खरे असू दे.
