STORYMIRROR

Sagar Bhalekar

Others

3  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - मास्क

माझी छोटीशी डायरी - मास्क

1 min
237

माझी छोटीशी डायरी - मास्क 

दिनांक - ३० जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

मास्क बद्दल खूप काही गोष्टी जगासमोर येत आहेत,की मास्क लावल्याने मुलींना फॅशन करता येत नाही.फॅशनला घेऊन एवढे हैराण आहेत लोक की लोकांनी मास्कलाच आपलं फॅशन मानून घेतलं आहे. जसे कपडे तसा मास्क. मास्कचे फायदेसुद्दा आहेत, मास्क लावून आपण एखाद्या व्यक्तीला चिडवुसुद्धा शकतात. लोक समजूतदार झाली आहेत, लोकांनी एकमेकांना उलट बोलण्यास कमी केलं आहे, कारण मास्क लावल्यानंतर त्या व्यक्तीच्या भावना दिसून येत नाही. आणि मास्क लावला की, लोक स्वतःला सुरक्षित समजू लागले आहेत.

हे तर मुलीबद्दल बोलणं झालं, आता तो माणूस ज्याला आपल्या घरातल्या सुनेने डोक्यावर पदर नाही घेतला तर ते आवडत नाही. मला अश्या लोकांना सांगायचं आहे, मास्क खरंच लावा, कारण तुमची सून सालापासून ह्या परिस्थितीशी सामना करत आली आहे, त्याचा त्रास तुम्हालासुद्धा समजेल. आता थोडं वेगळं बोलूया, काही लोकांचं म्हणणं आहे, की मास्क लावला की श्वास घ्याला खूप त्रास होतो परिणामी डोकेसुद्धा दुखत. माहित नाही किती लोकांना अश्या प्रकारच्या यातना होतात. अश्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, एकदा शिक्षा भोगा, तेव्हा तुमच्या सगळ्या यातना दूर होतील.

बाकी सगळे मास्क लावत जावा, शक्यतो गर्दी टाळा. 



Rate this content
Log in