Sagar Bhalekar

Others

2  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - लिखाणकामात अडचणी

माझी छोटीशी डायरी - लिखाणकामात अडचणी

1 min
211


दिनांक - ७ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी, 

     काही वेळा लिखाण काम लिहायला खूप कठीण वाटत, काही सुचतच नाही की, काय लिहू. कोणताच नवीन विचार सुद्द येत नाही.आज मला काहीस असच वाटत आहे. मला लिहायचं होत काही दुसरंच, पण मला काहीच सुचत नाही आहे. मग लोक म्हणतात, हा काहीच लिहत नाही नुसताच time pass साठी कथा लिहतो. तस पण कथा लिहणं कुठे कठीण काम आहे. 

लोक हे नाही समजत की, कथा हृद्य आणि डोक्याने लिहली जाते. एक कथा लिहिण्यापूर्वी लेखक विचार करत असतो, त्यानंतर आपल्या कल्पना शक्तीचा उपयोग करून तो कथा निर्माण करतो. जर का लेखक प्रेम ह्या विषयावर कथा लिहीत असेल तर तो प्रेम अनुभवतो, आणि जर का तो वेदनादायक कथा लिहीत असेल तर पाण्याचे काही थेंब त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसतील. म्हणून लेखकाला कधीच कमी समजू नका. जीवनात असे काही व्यवसाय आहेत, की त्यामध्ये लोकांना अजिबात रस नसतो तरी पण मन मारून ते काम करत असतात. पण लेखक मन मारून कधीच कथा लिहू शकत नाही. त्यामध्ये त्याला मन लावावंच लागत. कारण भावना असतील तर कथा आणि कविता आहेत. अपेक्षा करतो की, रोज नवीननवीन कल्पना मिळतील आणि त्यातून काही लिहायला प्रेरणा मिळेल. आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण खूप आवश्यक आहे आयुष्याला मनोरंजन बनविण्याकरिता. माझ्याकडून सर्व लेखक आणि लेखिकांना नमस्कार ज्या एवढ्या चांगल्या कथा आणि कविता मेहनतीने लिहतात. चला डायरी आता मला झोप येते आहे. उद्या भेटू एक नव्या अपेक्षांबरोबर. 


Rate this content
Log in