Sagar Bhalekar

Others

3.9  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - एनर्जी शिफ्ट

माझी छोटीशी डायरी - एनर्जी शिफ्ट

1 min
251


माझी छोटीशी डायरी - एनर्जी शिफ्ट

दिनांक - ८ जून २०२१

माझी प्रिय डायरी,

        आज रविवार असल्याकारणाने आज काहीच न करण्याच मन होत. आज रविवारच्या दिवशी तर लिखाणकाम पण करावस नाही वाटत. पण नाही लिहल तर कसंतरीच वाटत. असं वाटत की, आजचा दिवस खूपच खराब गेला. काही रचनातम्क केलच नाही आजच्यादिवशी. रोज काहीतरी नवीन करणे किती आवश्यक आहे आपल्या आयुष्यासाठी. काहीतरी नवं केलं तर आयुष्य किती सुंदर वाटत.

अश्या काळात मी संगीत ऐकतो, कधी कधी स्वतःहा गाणी बोलतो बेसुऱ्या आवाजांमध्ये आणि कधी कधी तर मी नाचतो सुद्धा. असं करायला मात्र खूपच मज्जा येते. कितीपण उदास, नकारात्मक आपले मन का असो, हे केल्याने पटकन आपला उदासी पण पळून जातो, आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटत. ह्याला मी आपल्या भाषेत एनर्जी शिफ्ट म्हणतो.

मला असं वाटत आपण जेव्हा नकारात्मक मानसिक अवस्थेत असतो तेव्हा आपली ऊर्जा एका ठिकाणी येऊन थांबते. सायंटिफिक भाषेत बोलायचे झाले तर आपल्या शरीरात रक्तस्त्राव बरोबर होत नसेल तर आपल्याला शरीरामध्ये खूप ठिकाणी दुखायला लागते. अश्या नकारात्मक ऊर्जाला सकारात्मक ऊर्जांमध्ये बदलायला एकच उपाय आहे, की आपण आपली एनर्जी शिफ्ट करावी. नाचल्याने किंवा गाणी बोलण्याने आपल्या शरीरमध्ये व मेंदूमध्ये सकारात्मक हार्मोन्स जन्म घेतात, जे नकारात्मक हार्मोन्सला दूर पळवतात. 

कदाचित ह्या केस मध्ये तुमचे मत वेगळे असू शकते. पण मी तर हाच उपाय करतो. मी आज दुपारी लिहण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण लिहू शकत नव्हतं. शेवटी मी थोडा नाचलो आणि गाणी ऐकली तेव्हा माझा मूड एकदम ताजातवाना झाला. आणि मी जून मधील माझ्या डायरीच एक पान लिहिलं. 

आज खूप उपयोगाच्या गोष्टी आपण शिकलो, चला तर मग भेटू उद्या एका नवीन विचारांसोबत.

                                                                                      


Rate this content
Log in