माझी छोटीशी डायरी - दुःख
माझी छोटीशी डायरी - दुःख
दिनांक - २६ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज मी बिछान्यावर झोपून झोपून कंटाळलो होतो, तेव्हा तूच एक माझा आधार आहे डायरी. माझ्या मनातल्या गोष्टी सांगून मी माझे मन हलके करत असतो. तुला तर माहित आहे की, माझा वाढदिवस असतो ते.
ह्या वर्षी विशेष असं काहीच करू शकलो नाही मी. नाहीतर नेहमी मी माझा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचो. पण ह्या वर्षी कोरोना असल्याकारणाने कुठे बाहेर जातासुद्धा आले नाही. म्हणून मी खूपच उदास झालो.आणि त्याच दिवशी एक दुःख अजून माझ्या पदरात पडलं ते म्हणजे "writing wall" स्पर्धेचा निकाल घोषित झाला. माझा मात्र स्पर्धेत क्रमांक आला नाही. म्हणून अजून थोडा निराश झालो.
जाऊ दे, स्पर्धाचा परिणाम हा आपल्या आयुष्यातला एक भाग आहे. आज दुःख तर उद्या सुख.
