Sagar Bhalekar

Others

3.5  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - धावपळ लसीकरणाची

माझी छोटीशी डायरी - धावपळ लसीकरणाची

1 min
154


दिनांक - २५ जून २०२१ 


माझी प्रिय डायरी,

काल रात्री बाबांनी सांगितले, उद्यापासून आपल्या भागात लसीकरण चालू होणार आहे तेव्हा तुम्ही उद्या तिकडे जाऊन लस घ्यावी. आमच्या दोघांच्या मनात एक प्रश्न आला, रांग तर भरपूर असणार. आणि नक्की लस मिळेलच हेसुद्धा सांगता येण्यासारखं नव्हतं.

सकाळी आम्ही १२च्या आसपास लसीकरण केंद्रावर गेलो. बघतो तर काय रांग तर नव्हती पण खुर्ची टाकून बसलेली माणसं. आमच मन सांगत होत, इथून निघून जावं आणि पुढच्या वेळी बघू. पण मनात हा प्रश्न उभा राहिला, सरकारने पुन्हा लसीकरण मध्येच थांबवले तर १-२ महिने पुन्हा वाट पाहावी लागणार.

मग आम्ही विचार केला, आता आलोच आहोत तर घेऊनच जावी लस. मी आणि माझी बायको दोघेही बसलो खुर्चीवर. तासन तास जात होता. पण माणसंकाही जास्त हलताना दिसत नव्हती. शेवटी अडीच तासांनी आमचा नंबर लागला. आमच्या दोघांमध्येही जीवात जीव आला. तसे आम्ही दोघे आत गेलो, आणि घेतली एकदाची ती लस.

घरी आलो, आता मात्र आम्हाला समाधान झाल्यासारखे वाटले. कधीपासून लस घ्याच चाललेलं. शेवटी घेतली ती एकदाची लस.

                                                                                                                                                                                                                    


Rate this content
Log in