Sagar Bhalekar

Others

4.0  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - बरोबर वाट

माझी छोटीशी डायरी - बरोबर वाट

1 min
119


दिनांक - २७ जून २०२१ 


माझी प्रिय डायरी,


आज जवळजवळ ६४ दिवसानंतर आपलं शहर पूर्ण अनलॉक झालं. काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यात मंदिर, बाजार, दुकाने, लग्नासाठी,अंत्यविधीसाठी काही थोड्या फार प्रमाणात अनुमती मिळाली आहे. काही काही ठिकाणी जिथे जास्त कोरोनाचा प्रभाव आहे तिथे अजूनही प्रतिबंध लावण्यात आले आहे. ह्याच बरोबर रात्री नाकाबंदी कडक करण्यात आली आहे.


माझी प्रिय डायरी आज दूरदर्शन वर माझ्या आवडीचा कार्यक्रम बघितला. काल माझं मन थोडं उदास होत. आज मी बघत होतो, की विचारांची शृंखला म्हणजे आपले मन. माणसाच्या मनामध्ये सतत काही ना काही विचार येतच असतात. आपले मन स्वतःहूनच बदलत. जर माणूस संकल्प बरोबर सतत अभ्यास करत राहिला तर त्याच्या मनामध्ये नक्की बदलावं घडून येईल. आणि मग त्याचे विचार बरोबरच्या दिशेने वाहतील. मी पण ह्याच प्रकारचा अभ्यास करत आहे.


निर्णय सुद्धा तुम्हालाच घ्याचा आहे, तुम्ही आपल्या मनावर नियंत्रण ठेवा नाहीतर मन तुम्हाला नियंत्रित करेल. 


Rate this content
Log in