STORYMIRROR

Sagar Bhalekar

Others

3  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - भीती

माझी छोटीशी डायरी - भीती

1 min
226

दिनांक - १४ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

        आज खिडकीमधून बाहेर पहिले तर मस्त हवा येत होती. मनात होत थोडं बाहेर जाऊन मस्त ताजी हवा घेऊ. पण असा विचार करत होतो तेव्हाच बायकोचा पाठून आवाज आला. आजकाल कोरोना हवेमार्फत पण पसरतोय, मास्क नाही लावल्या व्यतिरिक्त बाहेर पडायचा विचार सुद्धा करू नकोस.

कोरोना सुरु होण्याअगोदर मी आणि माझी बायको संध्याकाळी मस्त फिरायला जायचो. मस्त खाडीवर आमच्या तासनतास गप्पा रंगायच्या.


हप्त्यामधून एक किंवा दोन वेळा आम्ही वडा पाव किंवा समोसा खायचो. जेव्हा माझी बहीण डोंबिवलीमध्ये यायची, तेव्हा आम्ही सगळे मस्त

रात्री फिरायला खाडीवर जायचो आणि नंतर मग मस्त आमची आईस्क्रीमची पार्टी असायची. 

किती मस्त होते ते दिवस, आजही मला आठवतात. भीती वाटते की ते दिवस फक्त आठवण म्हणून तर राहणार नाहीना. 


Rate this content
Log in