Sagar Bhalekar

Others

4.0  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - बातम्या

माझी छोटीशी डायरी - बातम्या

1 min
247


दिनांक - ३० जून २०२१ 


माझी प्रिय डायरी,

आजकाल मी बातम्या बघणं बंद केलं आहे. कारण तर खूप आहेत, पण आमच्याकडे दिवसभर बातम्या बघणं चालूच असत. मी जरी नाही बघितल्या बातम्या तरी आमच्या आईसाहेब आहेत त्याच्या बातम्या न बघितल्याशिवाय दिवस जाणार नाही.


आज हॉलमध्ये आलो आणि टीव्ही वर एक बातमी बघितली, भारतामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूपच कमी आहे.५००० ते ६००० प्रति रुपये सिलेंडर आणि ज्यांना ऑक्सिजन पाहिजे त्यांना तो १००००- १२००० प्रति सिलेंडर मिळते आहे.


ते पण सगळ्यांना प्रति ५०००-६००० प्रति रुपये ने मिळत नाही आहे, खूप कमी लोकांना. त्यात पण सिलेंडर विकत घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांगाच्या रांगा बघायला मिळत आहे. काही लोकांनी रात्रीच रांग लावली आहे, सकाळी झाली तरी त्यांना अजून सिलेंडर मिळालेले नाही आहेत.


त्यामध्ये एका रिपोर्टरचा प्रश्न ऐकून एक व्यक्ती म्हणाला, हॉस्पिटलमध्ये भर्ती झालेल्या लोकांना साधं ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा पुरवू शकत नाही सरकार. त्या व्यक्तीच ऐकल्यानंतर असं वाटलं, की त्याच ते दुःख आणि यातना ऐकून कोणालाही दुःख होईल. अश्या परिस्थितीमध्ये व्यक्ती काय धैर्य आणि काय अपेक्षा ठेवणार? जिथे आपली माणसं हॉस्पिटलमध्ये बिना ऑक्सिजन सिलेंडर एक एक श्वासासाठी आयुष्यासाठी लढत आहे. 


Rate this content
Log in