माझी छोटीशी डायरी - आत्मविश्वास
माझी छोटीशी डायरी - आत्मविश्वास
दिनांक - २४ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आयुष्यामध्ये स्वतःला चिंतामुक्त राहायचं असेल, तर माणसांमध्ये आत्मविश्वास हा गुण असलाच पाहिजे. हो..आत्मविश्वास..म्हणजे स्वतःवरती विश्वास. कारण सुख आणि दुःख हे मानसिक स्थितीचे प्रकार आहेत. आपल्याला कधी यश मिळते तर कधी आपण अपयशी होतो. पण दोन्ही आपल्या आयुष्याचे भाग आहेत. पण जेव्हा आपण थोडे अपयशी होतो, तेव्हा आपला आत्मविश्वास डगमगू लागतो. पण त्याचा परिणाम आपण चिंतेला आपल्यावरती वर्चस्व करायला देतो. जर का आपला आत्मविश्वास मजबूत राहिला तर आपण कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हिंमत आणि विचारांच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो.
स्वतःपासून कधीच हरायचे नाही. स्वतःमध्ये आत्मविश्वास असला तर एक विशेष शक्ती आपल्या आतमध्ये असते ती आपल्याला मिळाली की, असम्भव काम सुद्धा संभव करू शकते. म्हणून कठीण परिस्थिती आली तरी डगमगू नका, खंबीरपणे त्या प्रसंगाला सामोरे जावा.
आपली पहिली प्राथमिकता आहे आपण स्वतः आणि विश्वास.
एका कवीने काही ओळी लिहल्या आहेत,
"रख भरोसा खुदपर, क्यू ढुंढता है तू फरिश्ते,
पंछीयोके पास कहा होते हे नकक्षे, फिर भी ढुंढ लेते हे रास्ते"
