माझी छोटीशी डायरी - आई
माझी छोटीशी डायरी - आई
माझी छोटीशी डायरी - आई
दिनांक - १६ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आई तुझ्यावर माझं प्रेम किती आहे, आई तुझ्याप्रती मला किती चिंता आहे हे सांगायला मला खास दिवसांची वाट पहाण्याची आवश्यकता लागत नाही. तुझ्याबरोबर व्यतीत केलेला एक एक क्षण माझ्या स्मरणात आहे. बस एकच प्राथर्ना करतो देवाकडे कि तू नेहमी अशीच हसत राहा, स्वस्थ राहा आणि सदैव तुझा हात माझ्या पाठीशी असू दे.
काही कविता फक्त तुझ्यासाठी…..
कितीपण तुझ्यासमोर खोटं बोलू
की मी बरा आहे,
तू माझ्या आवाजाने
माझ्या तब्येतीचा हाल
नेहमीच ओळखते आई |
किती सांगू तुला मला भूक नाही आहे,
तरी पण तू मला न खाता झोपू देत नाहीस |
जगाच्या दृष्टीमध्ये मी कितीपण साधा असू दे,
तुझ्यासाठी आई, तुझ्याशिवाय प्रेमळ कोणी नाही |
तू माझ्या प्रतिभेला नेहमी ओळखलस आणि खुप कौतुक केलेस,
तू मला धाडसी बनवलंस आणि स्वप्न बघून ते पूर्ण करण्याचं बळ दिलंस,
किती वेळा मला बोलायचं होत पण कधी बोलो नाही,
धन्यवाद आई |
मानतो शब्द छोटा आहे,
पण ह्याचा अर्थ खूप मोठा आहे,
सर्व जग एका बाजूला आणि एका बाजूला माझी आई आहे |
