माझी छोटीशी डायरी - आभार
माझी छोटीशी डायरी - आभार
दिनांक -: ६ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
कधी कधी मी विचार करतो, जर का स्टोरीमिरर नसत, तर माझ्यासारख्या लेखकांच्या कथा कोणी प्रदर्शित केल्या असत्या. माझ्या कथा डायरी मध्ये धूळ खात असत्या. मला खरंच स्टोरीमिररचे आभार मानायचे आहेत. आज स्टोरीमिरर मुळे नव्या लेखकांना आपल्या कथा प्रदर्शित करण्याचा अवसर मिळाला आहे. आणि आपल्या कथा वाचकांपर्यंत पोहचवण्यास खूप मदत होते.
कथा लिहायला तर मज्जा येतेच, त्याशिवाय कथा प्रदर्शित केल्यानंतर मिळणाऱ्या समीक्षा पाहून तर अजूनच मज्जा येते. आणि खरंच खूप काही ह्यातून शिकायला भेटते. पण त्याचबरोबर हे पाहून हैराण व्हायला होत की, लेखक हा किती विलक्षण विचारांचा असतो. लेखक कथेला कश्या कश्या ट्विस्ट देऊन अंत पर्यंत कथा घेऊन जातो. ते म्हणतात ना, "जहाँ ना पहुचे रवी, वहा पहुचे कवि".
स्टोरीमिरर वर कथा लिहलियामुळे आणि वाचल्यामुळे लेखक आणि वाचक ह्या दोघांमध्ये एक वेगळाच नातं निर्माण झालं आहे. एक दिवस आपण स्टोरीमिरर वर कथा लिहू नका, किंवा लेखकाला समीक्षा देऊ नका, तेव्हा आपल्याला एकदम सुन्न सुन्न वाटेल.
सकाळी सकाळी प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि आणि सगळ्याचे वेग-वेगळे उत्तरं वाचण्यास खूप चांगलं वाटत. स्टोरीमिरर च्या माध्यमातून जास्त नाही पण काही प्रमाणात एक दुसऱ्यांशी आपण जोडले गेले आहोत.
स्टोरीमिररने कितीतरी घसरलेल्या लेखकाच्या आत्मविश्वासाला सांभाळले आहे. स्टोरीमिरर नेहमीच लेखकाला काहीतरी चांगलं लिहण्यास प्रोत्साहित करत असते. चांगल्या लेखकांच्या काही कथा आपल्या हृदयाला भेदून जातात त्यामुळे वाचकांचा मानसिक तणावदेखील दूर होतो.त्यामुळे आज स्टोरीमिररचे माझ्याकडून खूप खूप आभार.
