माझी आई आणि मी.
माझी आई आणि मी.
माझी अ. सौ. स्व. आई सुनंदाला वाचनाची फार आवड होती. माझ्या लहानपणी ती मला ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी सांगायची. त्या मला शिवाजी, संभाजी तसेच रामायण आणि महाभारत या गोष्टी अतिशय मनोरंजकपणे सांगायच्या. कधीकधी ती मला 'झुंजार कथा' आणि 'काला पहाड़' यासारख्या प्रसिद्ध रहस्यमय मराठी गोष्टी पण सांगायची. मला त्यांच्याकडून गोष्टी ऐकायला फार आवडायच्या.
त्यांची गोष्टी सांगण्याची शैली खूपच छान आणि सुंदर होती. हळू हळू मी सुद्धा माझ्या वर्गमित्रांना माझ्या आईच्या शैलीत गोष्टी सांगायला सुरवात केली पण मला इतर कोणाच्या गोष्टी सांगण्या पेक्षा माला स्वरचित गोष्ठी सादर करण्यास फार आवडायच्या. एकदा मी आईला गोष्ट सांगत होतो तेव्हा मध्येच अडकलो. पुढची गोष्ट बनवण्यास मी खूप प्रयत्न केला पण माला ते जमल नाही. हे पाहून माझ्या आईने मला सांगितले, "मुला, तू आदी कागदावर गोष्ट चांगल्या प्रकारे लिह, न
ंतर तुला कुणाला ही गोष्ट सांगण्यात त्रास होणार नाही. ह्या प्रमाणे मी माझ्या आईच्या प्रेरणेने लिहिण्यास सुरवात केली. शाळेत प्रत्येक वर्गमित्रांना वेगवेगळ्या वेळी गोष्ट सांगण्या ऐवजी नोटबुकमध्ये गोष्ट लिहून प्रत्येकाला ती वाचायला द्यायला मला अधिक सोपे वाटले. हळूहळू माझ्या गोष्टसह वाचकांची संख्या पण वाढत गेली. जेव्हा मी सहावी इयत्तेत होतो तेव्हा माझी “राजू ची समयसूचकता” ही गोष्ठ लहान मुलांच्या गुजराती साप्ताहिक चंपक मध्ये प्रकाशित झाली. हे माझ पहिल मुद्रित झालेलं लिखाण होत. जेव्हा मी चंपक मधील गोष्ट माझ्या आईला दाखविली तेंव्हा तिला खूप आनंद झाला. चंपकमध्ये प्रकाशित केलेली माझी गोष्ट वाचून माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी तो क्षण कधीही विसरणार नाही. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट आहे कारण माझ्या आईच्या देहांत नंतर आज तो च मला लिखाण लिहिण्यास सतत प्रेरित करतो.
(समाप्त)