krishnakant khare

Others

2.2  

krishnakant khare

Others

माझे बालपण

माझे बालपण

5 mins
748


तुम्हा आम्हाला बालपण हा जिव्हाळ्याचा विषय,जसेजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपण अनुभवाने ,वयाने मोठे होत जातो.गेलेले दिवस आठवले का चित्रपटा प्रमाणे आपल्या जीवनातील एक एक गोष्ट आठवत जाते,आणि आपण झालेल्या गोष्टीत जर का ते क्षण मजेचे,आनंदाचे असतील तर सुखावून जातो,आणि जर ते क्षण दुखद,कष्टाचे असतील आपण व्यथित होतो,आणि एक वेगळ्याच विश्वात हरवून जातो,ह्या सर्व गोष्टी बालपणापासून ते आपण जगतो ते तिथपर्यंतच्या असतात,

आपण वर्तमान काळातील सर्वचित्र नाही पाहु शकत कारण आपल्याला पुढे होण्यार्या गोष्टी पासून अनुभव घ्यायचा असतो,पण भुतकाळातल्या झालेल्या गोष्टी बरोबर डोळ्यासमोर दिसतात.कारण अनुभवातून डोळ्यासमोर झालेल्या असतात,म्हणजेच आपण बालपण सारून मोठेपणा कडे वळतो ज्ञानाने,अनुभवाने,वयाने सुद्धा म्हणजेच आपला घटनाक्रम हा ज्युनिअर से सिनीयर हा होऊन जातो.

मला आठवतो तो प्रसंग बालपणातला ,मी अंगाने फार जाडा होतो,डोक्याचे काळेभोर, कुरळे केस होते,माझ्याच चेहर्यामोर्यासारखा,व्यक्तीमत्वाचा बाळकृष्णाचा फोटो कैलेंडर भिंतीवर लावलेला होता,व माझं नावराशीचे नाव 'क' ने सुरु असल्याने,आणि चुलतदादाचं नाव 'बळीराम 'असल्याने माझ्या बाबांना व सर्वानुमते माझं नाव "कृष्णाकांत"ठेवावे लागले.ज्योतिष्याने माझ्या बद्ल चांगली भविष्यवाणी केली होती,आणि त्याची भविष्यवाणी चुकत नाही असं अनुभव घेतलेले अनुभवी म्हणत.बालपणी कधी माझ्या नावावरून गप्पांना उधान आलं की मला ज्योतिषी माझ्या भविष्याबद्दल काय म्हणाला होता हे ऐकण्यासाठी आई कडुन माझं मन उत्साही होई पण आई मला वेगळ्यापद्धतीने सांगी आपलं काम आपण करायला हवं,कुणावरही अवलंबून राहता कामा नये,वेळेचे महत्व ओळखायला जमलं पाहिजे,कामात प्रामाणिकपणा असला पाहिजे,तूला ज्या कामात रस आहे ते काम निवडून काम कर,आवडीने काम कर,व डोक्यावर बरफ व,तोंडात साखर अशी रहाणी आणि वाणी असेल तर तुला ह्या जगात मोठं व्हायला कुणी अडवू शकणार ,असं ज्योतिषाने भविष्यवाणी करताना सांगितले होते. म्हणजे माझ्या बालमनावर एका अर्थाने आई मला वळण लावित होती.भविष्य भविष्य करीत बसलास आणि त्यावरच अवलंबून राहीलास तर काहीच सिद्ध होणार नाही तुला आपलं अस्तित्व सिद्ध करायच असेल तर तुला मेहनत हि घ्यावीच लागेल. भविष्या ने किंवा भाग्याने तुला जरी दिले असेल पण त्यासाठी कर्म करीत नसशील तर ते भाग्य दुर्भाग्य होऊ शकतो , म्हणून आपल्या भाग्यावर आशा करण्यापेक्षा आपल्या मनगटावर आपल्या कामावर तितकाच लक्ष असले पाहिजे.

तसं माझं बालपणही सर्वसाधारण मुलांप्रमाणेच आईबाबांच्या सावलीत गेलं,आई मात्र मला जपायची,

एकदा मला अचानक माझी वाचा जावी तसं माझं बोलणं बंद झालं, मला बोलता येत नव्हतं, मी मुका झालो होतो,काय झालं समजेना म्हणून घाबरण्याचे कारण झालं,मला सगळं हाताच्या इशारानेच आईबरोबर बोलावे लागत होते, त्याच बाळपणी मला कळलं की आई आपल्याला किती सांभाळून घेते ती. माझं बोलणं इशाराने कोणाला समजत नव्हते पण आईला माझं मुकपणाचा इशारा समजत होता . जर माझा इशारा कुणाला कळला नाही तर मला त्रास व्हायचा, वाटायचं माझं बोलणं दुसऱ्याला कसं काही नाही समजत कारण माझं काय आता बोललं नव्हतं कारण मला बोलता येत नव्हतं फक्त इशारांने हाताच्या इशाऱ्याने माझ्या गरजा बद्दल माझ्या घरच्यांना सांगायचो पण सगळ्यात कोण मला समजून घेत असेल तर ती माझी माऊली,माझी आई मला समजून घेत होती ते एक दोन वर्षाचे माझे मूकपण मला त्रास देऊन गेले अनुभव देऊन गेले आणि माझे बालपण हिरावून घेऊन गेले पण मला अनुभव देऊन गेले. पण माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी प्रयत्न सोडले नाहीत वैद्य डॉक्टर चार चार उपचार माझ्या मुक पणावर चालला होता आणि बरोबर दुसऱ्या वर्षी डॉक्टरांच्या काही ट्रीटमेंटने माझ्या जिभेखाली आलेला फोड तो नरम झाला आणि  पिकून फुटला, मला आईने ग्लासात पाणी देऊन तोंड स्वच्छ करायला सांगितले ,मी तसे केले ही आणि नंतर माझी जीभ हलकी झाली होती. आणि जसं तहानलेला पाणी मिळावा तसं मला फार फार बोलावसं वाटलं आणि माझी बोलताना घाई व्हायची पण आता मला चांगलं बोलायला जमलं होतं त्यामुळे घरात आनंदी वातावरण झाले होते माझं नाव शाळेला नवव्या वर्षी घालण्यात आलं होतं आणि मी वर्गात सगळ्या मुलांच्यात उंच दिसायचो, मी लिहिण्यातआणि वाचण्यात बरा होतो फक्त गणित हा विषय मला कठीण वाटायचा पाढे म्हटल्यावर मला अकरानंतरचे पाढे बोलायला कंटाळा यायचा पण जे कोणी शाळेत त्यानंतर चे पाढे बोलायचे त्यांच्याबद्दल मला अप्रुव्ह वाटायचं ,ते मुले हुशार वाटायचे मी पण अभ्यास करायला घ्यायचं घरी. बाबांनी माझ्यासाठी घरी ट्युशन लावलेला होता, शाळेतल्या फाटकबाई मला शिकवणीला यायच्या खरंच त्यांचे शिकवणे मला फार बरं वाटायचं 

एकदा तर शाळेतल्या मित्रांना मी बोललो "बाई, मैडम म्हणजे आपली आई सारखी", तर त्यातल्या काही मुलांनी माझी चेष्टा मस्करी केली होती.पण मी त्यांना समजावून सांगितलं ,"आपण जन्मापासून आईच्या सान्निध्यात राहुन आपल्याला काही जमत नाही जीवनात ते ती आई आपल्याला गुरु प्रमाणे शिकवत असते, आपल्याला वळण लावते , तशीच शाळेतली बाई देखील आपल्याला गुरूच्या जागी राहून विद्यार्थ्यांना वळण लावीत असते संस्कार घडवीत असते . मग आईला सुद्धा पवित्र भावनेने पाहत असतो मग शाळेतल्या शिक्षिका आईच्या सारखीच असते ना असं बोलल्या नंतर माझ्या मित्रांना, शाळेतल्या मित्रांना माझं बोलणं पटलं.

 बालपणनातलं आठवणी दाटुन येतात की मला माझ्या बद्दलच स्वाभिमान वाटायला लागतं. बालपणी आमच्या बाई फाटक बाई ह्या आमच्या चौथीच्या वर्गाला क्लास टीचर होत्या रोज शाळा सुटताना आजचा वार असेल त्या वाराची कविता बोलून दाखवत आणि आमच्याकडून सुद्धा बोलून घेत आणि परवाच्या करून घेत, परवाच्या म्हणजे उजळणी सुभाषित पावकी निमकी आमच्याकडून पाठांतर करून घेत . त्यामुळे आमचा अभ्यास नियमितपणे चांगला व्हायचा ,बाई सडसडीत बांध्याच्या आणि व्यवस्थित टीप टॉप असायच्या आणि ठाण्याहून  पातळीपाड्याला शाळेत येताना आपल्या कामाशी काम ठेवून शाळेत यायचा त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदरभाव झाला होता. पण एके दिवशी पातलीपाडा गावातला त्यांच्याच वयातला एक मनुष्य त्यांच्यावर नजर ठेवून होता, पातलीपाडा स्टॉपला बस मधून त्या फाटक बाई उतरल्या की सरळ शाळेत यायच्या पण हा मनुष्य कुठे रस्त्यात असला की की फाटक बाई ना बघून बोलायचं आणि गाणं गायचा" मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो" हे तो गाणं गायचा 

 आमच्या फाटक बाईंनी एकदा-दोनदा त्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर तो जास्तच लहरीपणा करायला लागला ,आमची उंच जाग्यावर शाळा होती फाटक बाई बरोबर शाळेत आल्या आणि बॅग पर्स टेबलावर ठेवून बाहेर आल्या आणि रस्त्यात उभ्या असलेल्या त्या मनुष्याला सगळ्यांसमोर त्याची पूर्ण इज्जत काढली आणि परत माझ्या वाटेला जाऊ नको आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करू नको नाहीतर पोलीस कारवाई तुला महागात पडेल असा फाटक बाईंनी त्या मनुष्याला सज्जड दम दिला ,ह्या प्रकाराने त्याची सगळीकडे छीथू झाली होती,परत तो मास्तरणीच्या नादाला लागेल कशाला आणि आम्ही लहान मुलं सगळा प्रकार पाहत होतो ,

मला आपल्या फाटक बाईबद्दल आदर आणि स्वाभिमान वाटलं ,स्त्री जर करारी आणि आपल्या पावलात एकनिष्ठ असली तर त्या माणसाची काय बिशाद तो मनुष्य तिच्याकडे वाईट हेतूने बघायला सुद्धा शंभर वेळा विचार करील आणि तो मनुष्य तिच्या वाट्याला परत जाणार नाही,   

 मला बालपणी हे कळलं कि माणूस चूक करीत नसला तर तो अन्यायाविरुद्ध लढू शकतो.बालपणातला अशा गोष्टी सगळ्यामध्ये काहीना काही आठवणीचे असतात,इतरांना ते वाचायला, ऐकायला बरे वाटतात आणि त्यातले क्षण घेण्यासारखे असतात.


Rate this content
Log in