लॉकडाऊन
लॉकडाऊन
1 min
341
लॉकडाऊनच्या काळात तो प्रथमच माणसात आला होता. मुलांसोबत खेळणे, गप्पागोष्टी करणे, सर्वांनी मिळून जेवण करणे. ती मोठ्या कौतुकाने सारं काही बघायची. मारझोड नाही, शिव्या नाही की रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरणे नाही.
पण 'दारुची दुकाने आता सुरू राहतील.' ही दूरदर्शनवरील बातमी ऐकली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माणसाचा हैवान होण्यासाठी आता वेळ लागणार नव्हता.
