Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Sakharam Aachrekar

Others

4.9  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन दिवस 8

लॉकडाऊन दिवस 8

2 mins
437


प्रिय डायरी,


सकाळी सकाळी मोबाईल वाजला, टाटा पॉवर च्या कस्टमर केअर तर्फे होता. कंपनीची बिल्स क्लोज करता करता घरचं वीज बील भरायचं राहून गेल होतं. ऑनलाईन बिल पेमेंट केल.

आणि थोड्या रेशन खरेदीसाठी खाली उतरलो, लॉकडाऊन अगोदर माझे जवळपास सारेच व्यवहार कॅशलेस असायचे, त्यामुळे आधी एटीएम मधून पैसे काढावे लागणार होते. जवळपासच्या दोनही एटीएम तपासले, पैसे नव्हते, थोड्या दूर असलेल्या एटीएम मध्ये पैसे असावेत कारण तिथे बरेच लोक रांगेत ताटकळत उभे होते. मी ही त्या रांगेत उभे राहिलो, आत एक दांडगा जाडजूड कोतवाल उभा होता, प्रत्येकाला एकवेळी 2000 पेक्षा जास्त रकम काढू देत नव्हता.


जवळपास तासाभराने मी आत पोहोचलो, तासाभराची किंमत मिळाली होती, रुपये दोन हजार फक्त..... तसाच पळत पळत किराणा दुकानात आलो; त्याने बाहेरच बॅरीकेड लाऊन ठेवले होते, लांब रांग होती, तशी त्याने सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली होती, एका हाताच्या अंतरावर रिंगण आखलेली होती ज्यात सगळे उभे होते, मीही उभा राहिलो, एटीएम मध्ये एक तास आणि इथे अजून एक तास,संपन्नतेच्या पर्वातली वाट कोरोनामुळे चिंचोळी झाली होती, अन आज या चिंचोळ्या वाटेवर आम्ही सर्व रांगेत उभे होतो, शेवटी माझा नंबर आला. बराचसं सामान त्याच्याकडे नव्हतं. पण रोजच्या मूलभूत गरजा भागतील इतकं जुजबी सामान मात्र मला मिळालं.


अत्यंत मानसिक आणि शारीरिक थकव्याने मी घरी परतलो घरात ईंडक्शन कुकर असल्याने गॅसची गरज नव्हती, आल्या आल्या मी स्वतःला बिछान्यावर झोकून दिले. तासभर अंगातला शिणवटा घालवून मगच लॅपटॉप हाती घेतला, काही काम नव्हत पण हजेरी तर लावायला हवी ना..... म्हणुन आपलं सिस्टम वर्क, अवांतर काही करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतोच, आज सकाळीच लोकांची विस्कटलेली घडी मी पाहून आलो होतो. आमचा विभाग काल संध्याकाळपासून दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सील केला होता, पोलिसांची वाढीव कुमक आली होती, मुंबईची हद्द मानखुर्दला संपत असल्याने हा भाग अधिकच संवेदनशील झाला होता. थोडा वेळ बातम्या पाहण्यात घालवला, पण भारतमातेच्या भूमीवर सुरू असलेला कहर काही सहन होईना....


शेवटी नाईलाजाने मन दुसरीकडे वळवावे लागले, यु. के. मधून एक सॉफ्टवेअर चा प्रोजेक्ट आला होता, त्याच्या संलग्न काही कागदपत्रं पडटाळताना कातरवेळ उलटून गेली होती. रात्रीच्या जेवणासाठी शेवांची भाजी बनवली ठरल्याप्रमाणे सुधीर जेवायला आला, आमचं एकमेकांकडे असं दिवसाआड आलटून पालटून जेवण सुरू झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात आमच्या हृदयाचा बालपणाकडे पुन्हा प्रवास सुरू झाला होता, आज रात्री आम्ही विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याखेरीज टॉम अँड जेरी मुव्ही पाहणे पसंत केले, कित्येक वेळ आम्ही पूर्वीचे ते क्षण जागवत होतो.......... 


Rate this content
Log in