Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Sakharam Aachrekar

Others


4.8  

Sakharam Aachrekar

Others


लॉकडाऊन दिवस 21

लॉकडाऊन दिवस 21

2 mins 457 2 mins 457

प्रिय डायरी,


सकाळी आठ वाजता जाग आली, थोड्या वेळाने अंथरूणातून सरसावून चहा कडे वळलो. सकाळीच कामात गुंतणं पटलं नाही, म्हणून काही वेळ मोबाईल वर मित्रांसोबत गप्पा मारल्या, नाही म्हणायला तासभर तरी गेलाच. मग हळू हळू कामाकडे वळायला लागलो, नवीन स्लॉट च्या नव्या टार्गेट्सची यादी आली होती. ती पाहून घेतली, आणि त्या यादीच्या नियमाबरहूकूम काम करायला सुरुवात केली.


अजून डोळ्यावर झोप कायम होती, थोडी सुस्ती घालण्यासाठी खाली जाऊन पेपर घेऊन आलो. सकाळच्या उन्हातही फार उकडत होतं. येताना सरबतासाठी लिंब, आणि घरात लागणारं थोडं रेशन घेऊनच आलो. घरी येऊन लिंबू सरबत घेऊन पुन्हा कामाला लागलो. आज संध्याकाळी आम्हाला आमच्या कामाचा परतावा मिळणार होता गेल्या आठवड्यातल्या प्रोजेक्टवर अवलंबून असलेल्या आमच्या बढतीवर आज निकाल सुनावणी होती. आमची बढती होणार अशी अस्पष्ट कुजबुज कानी पडत होतीच. तेवढ्यात सुधीर घरी आला, दुपारपर्यंत आम्ही एकत्र काम केले. दुपारी तोंडी लावायला म्हणून कुरडया तळल्या.


काम बाजूला ठेवून आम्ही काही वेळ कॅरममध्ये मन रमवलं. तस पाहता मी जास्तकरून मैदानी खेळ खेळायचो, पण आता मी ही माझं मन घरीच खेळल्या जाणाऱ्या खेळांत मन रमवत होतो. तीन वाजले होते, मेल आणि बॉसचा फोन एकत्रच आला. "अभिनंदन, तुमची पोस्ट ज्युनिअर सुपरवायझर ग्रेड 2 झाली आहे" इतकाच काय तो संवाद मी ही "थँक यू, थँक यू" म्हणत फोन ठेवला, दोघेही ज्यूनिअर सुपरवायझर ग्रेड 2 मध्ये आलो होतो. सॅलरी स्ट्रक्चर मेलमध्ये आल होतं. वेतन 4,532 रुपयांनी वाढले होते शिवाय आता आम्ही अधिकाऱ्यांच्या यादीत आलो होतो, मी अगोदर फोन करून आईला ही वार्ता दिली, तिच्याही आनंदाला पारावार उरला नाही.


थोड्या वेळाने सुधीरने खाली जाऊन रवा आणि सुका मेवा आणला रात्री जेवण न बनविता शिऱ्यावर आपली भूक शमवायची अशी योजना केली. सुधीर परत आल्यावर मग या बढतीचा समारंभ आम्ही साजरा केला. गिटारच्या तारांतून कितीतरी वेळ आम्ही मैफिल सजवली. राधिकाने आमच्यासाठी शिरा बनवला. देवाला नैवेद्य दाखवून आम्ही शिरा खाल्ला, राधिका आणि काकांनीही ह्या आनंदात आमच्यासह सहभाग दिला. दोघेही खुश होतो. आनंदाने बराच वेळ गप्पा झाल्या, भविष्यासाठी काही योजना करून ठेवल्या, आमच्या इतर मित्रांना ही आनंदवार्ता दिली. या गडबडीत रात्र केव्हा हरवली समजलच नाही...


Rate this content
Log in