Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sakharam Aachrekar

Others


4.8  

Sakharam Aachrekar

Others


लॉकडाऊन दिवस 17

लॉकडाऊन दिवस 17

3 mins 320 3 mins 320

प्रिय डायरी,


सूर्य तसा अजून उगवायचा होता, लवकरच जाग आली, तोंडाला पाणी लावण्याअगोदर चहाचा पेला लावण्याची सवय अगदी गावापासूनच, शहरात काही प्रमाणात फरक पडला होता, पण खरंच आज दात घासायचा कंटाळा आला होता, त्यामुळे आंघोळीनंतर सरळ चहानेच दिवसाची सुरुवात झाली.


लॉकडाऊनच्या इतक्या अवधीत बर्‍याच बेपत्ता नातेवाईकांशी ओळख झाली होती. प्रत्येक अनोळखी व्यक्तीही फोन केल्यावर, फार अदबीने विचारपूस करी, माणसांमध्ये 15 दिवसात घडलेल्या या बदलाची मला अपूर्वाई वाटते. या लॉकडाऊन चा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार होता, म्हणजे संध्याकाळपर्यंत निर्णय येणार हे नक्की होतं. आज सकाळच्या सत्रात सगळं काम आटोपायचं आणि संध्याकाळी आराम करायचा, अस ठरवलं, आणि असही आज नव्या प्रोजेक्टचं सबमिशन होतं, सुधीरने मला चेकिंग एक्झिक्युटिव्हचं (मुख्य तपासक) तापदायक काम दिल होतं, आणि फायनल सबमिशन चेकिंग तो स्वतः करत होता, मी पटापट तीन चार रीपोर्ट सबमिट केले, आणि सुधीरने ही ते फायनल केले.


सूर्य हळूहळू वर येऊ लागला होता, तसा मी खाली उतरून माझा रोजचा पेपर घेऊन आलो, तीन दिवसांत जवळजवळ 450 कोरोना रुग्ण सापडल्याची बातमी अगदी ठळकपणे छापून आली होती, त्यामुळे लॉकडाऊनचं भविष्य अजून काही काळ वाढणार असे प्राथमिकतः दिसत होते, आज व्हॉटस्अँपच्या आमच्या भागातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रुप वर गरिबांसाठी आर्थिक तसेच अन्नस्वरुप मदत करण्याचे आवाहन करण्यात आले, मी ही स्वखुशीने त्यात 1000 रुपयांचे योगदान दिले. आजच्या क्षणाला मुंबईसारख्या महानगरात जिथे लोकसंख्या सुमारे 2.5 कोटींच्या घरात आहे, आणि जिथे स्थानांतर करणार्‍या कंत्राटी मजुरांची संख्या जास्त आहे अश्या ठिकाणी हे असे अनेक उपक्रम या आणीबाणीच्या काळात स्थानिकांनी राबवले पाहिजेत.


गेल्या महिन्यात उरलेल्या पाकिटातला पास्ता दुपारसाठी बनवला, त्याच्या सोबत माझं चेकिंगचं काम सुरू होतचं तसही आम्हाला शेवटची तारीख दोन आठवडे पुढे होती, पण आम्हाला आम्ही या लॉकडाऊनमध्येही किती कर्तव्यतत्पर आहोत हे दाखवायचे होते, म्हणून आम्ही सर्वच जणांनी आजचा शनिवार सबमिशनसाठी ठरवला होता. सुधीरने सगळ्या शीट्स भरून सबमिट केल्या, आणि माझ्याकरवीही जवळपास सार्‍या रीपोर्ट्सचं चेकिंग झालं होतं. त्यामुळे मी ही पटकन ते सबमिट केले. सूर्याच्या संध्याकाळच्या कलत्या किरणांसह मी आणि सुधीर आम्ही दोघांनी चहा घेतला, दुसरीकडे प्रोजेक्ट अपलोड होत होता, त्याच्या गुणवत्तेवर आमची बढती अवलंबून होती.


तसं पाहता जवळपास प्रत्येक शनिवारी सुधीर आणि राधिका कुठे न कुठे फिरायला जात, पण लॉकडाऊन मुळे गेले तीन आठवडे त्यांना म्हणावा तसा एकांत मिळाला नव्हता, आज गच्चीवर मला न नेता सुधीर आणि राधिका दोघेच गेले, मी ही त्यांचा एकांत भंग करू इच्छित नव्हतो. प्रोजेक्ट अपलोड झाल्यावर सुधीरच्या मेल वरून बॉसला मेल पाठवला, आणि माझ्या मेलवरून क्वालिटी इन्फेक्शन शीट मेल केली. उद्धव ठाकरे यांनी विडिओ काॅन्फरन्स द्वारे महाराष्ट्रवासियांना संबोधित करत, अजून 15 दिवस लॉकडाऊन ची मुदत वाढवली, म्हणजे आता लॉकडाऊन ची अंतिम तारीख 30 एप्रिल झाली होती. अद्याप म्हणावी तशी रात्र झाली नव्हती.


आजच्या जेवल्यानंतरच्या प्रोग्राम मध्ये शोले होता, आजही आम्ही काकांकडेच जेवलो, आणि सुधीर काकांना माझ्या घरी घेऊन आला. आमच्या ऑफिस प्रोजेक्टर वर आम्ही शोले लावला, भारताच्या चित्रपट इतिहासातला ध्रुव तारा.... चित्रपटाच्या कितीतरी सीन्स च्या मध्ये काका आम्हाला थांबायला सांगून चित्रपटाशी निगडित अनेक मनोरंजक किस्से सांगत आजच्या रात्रीत संपूर्ण चित्रपट संपवणे अशक्य होते, त्यामुळे मध्यंतरानंतर आम्ही दुसर्‍या दिवशी पाहण्याचा निर्णय घेतला. लॅपटॉप बंद करताना बॉसचा अभिनंदनपर मेल पहिला चेहर्‍यावर एक हलकं हसू आलं, बढतीची स्वप्ने पाहत पाहत मी रात्रीला कुशीत घेतले होते...


Rate this content
Log in