The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sakharam Aachrekar

Others

4.8  

Sakharam Aachrekar

Others

लॉकडाऊन दिवस 6

लॉकडाऊन दिवस 6

2 mins
381


प्रिय डायरी,


आज महिनाअखेर... पगाराचा दिवस. ठरल्याप्रमाणे दुपारी 03:00 वाजता पगार येणार की कोरोनामुळे उशिरा येणार या विचारातच चहापान उरकले. फोन करून घरचे कुशलमंगल झाले, अन मी लॅपटॉपसमोर स्थित झालो. काही वेळ काम केले, आणि सुधीरच्या रूमकडे वळलो, त्याची नुकतीच साफसफाई उरकली होती.


त्यालाही त्याच्या जुन्या आठवणीतल्या काही वस्तू नव्याने मिळवल्या होत्या, त्यातच एक होतं ते म्हणजे बुद्धिबळ, आम्ही लहान असताना मिळून पैसे जमवून घेतलेलं, आज आम्ही कितीही कमावत असलो तरी आमच्यासाठी ते नेहमी अनमोल आहे. त्याने मला न विचारताच डाव मांडला आणि बघता बघता डाव रंगला, काका आणि राधिका अर्ध्या तासाने आमच्याशी समरस झाले. पाच-सहा डाव झाल्यानंतर आम्ही थांबलो, एक डाव बरोबरीत सुटला, काही तो जिंकला काही मी, स्पर्धा नव्हती, आनंद होता, आज दुपारी जेवणाचा कार्यक्रम काकांच्याच घरी संपन्न झाला, त्यांचं नेहमीच पुणेरी जेवण आम्ही वाहवा करत चट्टामट्टा केलं. तेवढ्यात पगाराचा मेसेज आला, दोघेही खुश झालो, काकांनी आम्हाला बसायला सांगितले, आणि आतल्या खोलीतून हार्मोनियम घेऊन आले, अशी संगीतप्रेमी मंडळी इमारतीत फक्त आमच्या मजल्यावरच आहे, काकांनी दाते काकांचं "दिल्या घेतल्या वचनांची" गाणं सरेल रित्या आळवलं, मग न सांगताच अंताक्षरी रंगली, मी आणि काका अन सुधीर आणि राधिका,तब्बल तीन तास चालला आमचा हा विरंगुळ्याचा डाव...


लॉकडाऊनमध्ये फसलेल्या आमच्या मित्रांची कैफियत त्यांच्या व्हॉटसअँप स्टेटस वर झळकत होती, अन कोणत्याही परिस्थितीत आनंद शोधणारे आम्ही दोघेही अवलिया असा परिवारीक ओलावा मिळाल्याने सुखावून गेलो होतो. आमचा हा बहर आमच्या व्हॉटस्अँपच्या स्टेटसमधूनही ओसंडत होता. संध्याकाळी त्या जादुई किरणांचा आस्वाद घ्यायला आम्ही तिघे (सुधीर, राधिका, आणि मी) गच्चीवर आलो, हे दोघेही प्रेमी त्या सूर्यास्ताच्या अदृश्य वलयांच्या प्रभावाशी एकरूप झाले, मी आपला गच्चीवरून बाकी घरांना न्याहाळत होतो. बरीच दृश्ये अगदी स्पष्ट दिसत होती, कुणी एकत्र जेवत होते, कुणी गप्पांत रंगले होते कोणी शांत आराम करत होते तर कुणी अजून काही करत होते, थोडक्यात या लॉकडाऊन नंतर बर्‍याचश्या प्रमाणात, आंतरिक मतभेद संपून शहर कुटुंबवत्सल झाले होते, आकाशातून बलाक पक्षांचा थवा आवाज चिरत गेला, मी तर भानावर आलो पण हे दोघे काही आपल्या विश्वातून बाहेर येईनात, हल्ली काम जास्त नसल्याने झोप काही लवकर येत नाही, मग या हातांना काहीतरी चाळा पाहिजे, म्हणून मी त्या दोघांचा एक फोटो टिपला रात्री चित्र काढण्यासाठी...


आयुष्यातल्या या पानांना कोरून ठेवण्यासाठी शब्द नव्हते, अन् हे क्षण टिपण्याएवढी कॅमेरामध्ये जागाही नव्हती. डोळ्यात सामावता येईल इतका आसमंत पाहून मी पायर्‍या उतरू लागलो, घरी येऊन पुन्हा फावला वेळ लॅपटॉपमध्ये कामात घालवला. जेवण बनवणे अपरिहार्य होते, सुधीरला जेवण न बनवण्यास सांगून माझ्या घरी बोलावले, अन् एकत्र मिळून काका आणि राधिकाला सोबत घेऊन मस्त कांदाभजीचा बेत केला, हलक्याफुलक्या गप्पांसोबत आम्ही कांदाभजी फस्त केली, सगळे आपापल्या घरी गेल्यानंतरही बराच वेळ मी राधिका आणि सुधीरचं टिपलेलं चित्र रेखाटत राहिलो...


Rate this content
Log in