Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sakharam Aachrekar

Others


4.9  

Sakharam Aachrekar

Others


लॉकडाऊन दिवस 4

लॉकडाऊन दिवस 4

2 mins 356 2 mins 356

प्रिय डायरी,


      दोन तीन दिवसांपासून तापमान कमालीचे वाढत आहे, सकाळी 7 वाजता अचानक लाईट गेली, त्यामुळे जाग आली. आतच तर झोपलो होतो, 3 वाजता.. अजून झोपायची इच्छा होती पण या गरमीमध्ये झोपणं अशक्य होतं. कसबसं धडपडत उठलो, आजुबाजूला लाईट गेली आहे का? याची खात्री केली, सुधीरचीही झोपमोड झाली होती, पण सुट्टीच सुट्टी असल्याने आम्ही फ्रेश होऊन घेतले, राधिका ने चहा आणि उपमा आणून दिला, जो आमच्या आळशीपणाला आणखी चालना देत होता. नाश्त्यानंतर घराकडे नजर टाकली, कालची खरकटलेली भांडी सिंकमध्ये तशीच पडून होती, रात्रीच्या आमच्या टेबलावर पत्ते अस्ताव्यस्त पसरले होते, काही खाली पडले होते, बहुतेक पंख्याच्या झोतामुळे.

      

सकाळीच आशा भोसलेंची गाणी लावली! अगदी जोरदार आवाजात, बिल्डिंग मधली बहुतेक मंडळी या कोरोना प्रकरणामुळे आपापल्या गावी निघून गेली होती, त्यामुळे आवाजाला विरोध कोणीच करणार नव्हतं, मनात राहून राहून वाटत होतं की आपणही शनिवारीच गावी जायला हवे होते, अगोदर कालची भांडी नंतर कपडे असा रोजचा नकोसा दिनक्रम आटोपला तोवर लाईट आली होती, थोडासा आळस देत शरीराला पलंगावर झोकून दिले, आणि काही वेळ वि. स. वाळिंबे यांच्या हिटलर ने बराच वेळ माझे मनोरंजन केले. दुपार झाली तशी मी माझी 1979 सालची टोपी घालून खाली आलो, अगदी त्याच जुना थाटात, केस वाढल्याने नको वाटत असतानाही हिप्पी स्टाइल ठेवायला लागत होती. तोंडावर मास्क आणि हातात रजिस्टर पकडल्यागत वाटणारी माझी कापडी पिशवी..., एखादा महानगरपालिका मुकादम आपल्या हाताखालच्या धूर फवारणी करणार्‍या कामगारांची हेटाळणी करायला निघावा तसे, पण काय करणार शहरात सगळ्यांची स्थिती माझ्यासारखीच झाली होती. 

      

काल वाशीतील मुख्य मंडई सुरू झाल्याने काही भाजीपाला मिळण्याची आशा होती. बर्‍याच लोकांची झुंबड उडालेली दिसत होती. पोलिस यंत्रणा त्यासमोर अगदी हतबल, कारण ही सर्वच मंडळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आलेली होती, असो आमच्या भागातल्या लोकांमध्ये अजून म्हणावी तशी जागरूकता निर्माण झाली नव्हती. मी काहीशी फळफळावळ घेऊन परतलो. दुपार झालेलीच होती, काही फळे खाऊन भूक भागवली. बरीच वर्षे दुपारचे जेवण कंपनीत करायची सवय असल्याने घरी राहून दोन वेळ जेवण करण्याचा खटाटोप माझ्याने करवत नव्हता. म्हणुन मी आपला दुपारी असचं काही न काही खाऊन भूक भागवायचो, अन रात्रीचं जेवण करायलाही तसं जीवावरच यायचं. आज संध्याकाळी आईशी बोलल्यानंतर शाळेतल्या माझ्या आवडत्या शिक्षकांना फोन केला, अगदी बर्‍याच दिवसांनी असं मन मोकळं बोलण्याचा योग आला. संध्याकाळी सोसायटीच्या आणि महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण इमारतीत औषध फवारणी करण्यात आली, मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असल्याने मी यात लागणार्‍या सहकार्यास आघाडीवर होतो, रात्री उशिरापर्यंत आमचे हे काम सुरू राहिले, संपूर्ण जगावर आलेलं हे महामारीचं संकट लवकरात लवकर टळू देत अशी देवाला मनोमन प्रार्थना करत पहुडलो, अश्या रितीने लॉकडाऊनचा चौथा दिवस संपला.... 


Rate this content
Log in