लॉकडाऊन दिवस - 3
लॉकडाऊन दिवस - 3


पावर सिस्टीममध्ये काहीतरी तांत्रिक कारणामुळे पावर ऑफ झाला होता. त्यामुळे रात्री झोपच व्यवस्थित लागत नव्हती. काय करायचं सुचतच नव्हतं, सहजच मनामध्ये विचाराला आला. मित्राला फोनवरून कॉल केला. मित्र कॉल रिसीव्ह करत नव्हता. पाहता क्षणी मला असे जाणवत होते का कोणास ठाऊक. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल बहुतेक.
सहजच माझा डोळा कधी लागला, ते समजलच नाही. सकाळी सर्व करत असताना अचानक कालच्या पेटीच्या चावीचे लक्षात आलं. आता मनाचे जणू खरंच हिय्या केला होता. आज मी ती चावी शोधणार आणि आणि माझ्या असंख्य अश्या लहानपणीच्या त्या गोंडस दुनियेमध्ये पुन्हा एकदा भारावून जाणार. असा बराच वेळ गेला पण किल्ली भेटत नव्हती. अखेर अथक प्रयत्नांनी मला ती किल्ली सापडली. पाहताक्षणीच मन अगदी भारावून गेलं. अखेर तो क्षण आला...