लॉकडाऊन दिवस - १३
लॉकडाऊन दिवस - १३


कालची रात्र बघायचे झाले तर झोप नीट लागत नव्हती. त्याला कारण सुद्धा फार भयानक होतं, बघु काय होतं असे लोक न विचार करत खरंच जे फिरत होते. या अशा प्रसंगामुळे आता त्या विषाणूने आपले जग घट्ट पद्धतीने निर्माण केले होते. आता त्याने त्याचे अस्तित्व जगाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये नव्हे तर आता गाव पातळीवर सुद्धा त्याने त्याचे रोप लावायला सुरुवात केली.
खरंच जर बघायचं झालं तर, शासन, पोलीस अधिकारी, आरोग्य सेवा तसेच अनेक संस्था, लोक आपापल्या परीने जेवढे काही करता येईल तेवढे करत होते. पण लोकं त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नव्हते. आता त्याचेच परिणाम सगळीकडे जाणवायला सुरुवात झाली होती. आतातरी लोकांनी आपले विचार बदलण्याचे आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची वेळ आली होती. जर आता आपण यावर मात केली नाही तर पुढील परिस्थिती फार भयानक होईल या गोष्टीचा सर्वांनी विचार करायला हवा...