Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Sakharam Aachrekar

Others


4.9  

Sakharam Aachrekar

Others


लॉकडाऊन दिवस 10

लॉकडाऊन दिवस 10

2 mins 371 2 mins 371

प्रिय डायरी,


आकडे वाढत चालले होते, आपल्याच जबाबदार समाजातल्या काही लोकांच्या असमंजस कृत्यांमुळे आणि काही आततायीपणामुळे आणि माझ्यासारखे अनेक इमानी चाकरमानी दृढतेने हा लॉकडाऊन पाळत होते. कालच्या दुसर्‍या महायुद्धाच्या शिकवणीत आमची पत्त्याची मैफिल राहूनच गेली, ती आज सजणार होती.


सकाळी उठलो तेव्हा सुधीरच्या घरी होतो, घरी येऊन सकाळची कामं आटोपली, घरी एक फोन केला, चहाचा कप घेऊन लॅपटॉपसोबत जमिनीवर पसरलो. मुंबईत अद्याप कोरोना थैमान सुरू असल्याच्या बातम्या मुखपृष्ठावर झळकत होत्या, अशा गंभीर परिस्थितीत मुंबई शांत झाली होती, पण यात राहणारे काही घटक याच मुंबईला आतून पोखरत होते, सध्याची परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन अजून महिनाभर वाढणार हे स्पष्ट दिसत होते. कंपनीकडून बिलिंगच्या नवीन कामासाठी एक नवीन टीम घोषित झाली होती, मी आणि सुधीर दोघेही मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या पदापासून कधीतरी आमची कारकीर्द सुरू केली होती, त्यामुळे आमचेही नाव त्यात होते. अशा आणीबाणीच्या वेळेत हा उगा ताप माथी मारला म्हणून कंपनीला बराच दोष देत उठलो, मॅनेजर साहेबांना फोन केला, त्यांनी बरचसं काम फोनवर समजावलं. या टीमचं नेतृत्व सुधीर करत होता, त्यामुळे माझ्यावर कामाचा जास्त भार पडणार नव्हता.


आम्ही बाकी सार्‍या सदस्यांसमवेत एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली, सर्वानुमते हा प्रोजेक्ट पुढच्या सात दिवसांत संपवायचे ठरले. तसा प्रोजेक्ट गुंतागुंतीचा असला तरी जास्त काळ लांबणारा नव्हता, फारफार तर पुढच्या शनिवारी सबमिशन करायचे ठरले. कामे वाटली गेली, सुधीरनं साहजिकच मला त्याच्या कामामध्ये घेतलं, तसा दोघांचा ताळमेळ चांगला होता. टीममध्ये काही नवागत असल्याने 7 दिवसांचा कालावधी वाढण्याची शक्यता होती. दुपारी साध्यासोप्या गूळ पोह्याची मेजवानी चाखत आम्ही काम सुरू केले. संध्याकाळपर्यंत काम झाल्यावर काही विरंगुळा म्हणून काम बाजूला ठेवले. सुधीरने गिटार वाजवून बराच वेळ माझे मनोरंजन केले, कधीतरी असाच गिटार तो राधिकासाठी वाजवायचा...


संध्याकाळी दोघांनी माहितीची जमवाजमव करत बॉसला रिपोर्ट दिला, दोघांना या लॉकडाऊनमध्ये बढतीची नामी संधी चालून आली होती. मुंबईतली आवक जावक उत्पादनं पूर्ण थांबली होती, तरीही कोरोना फैलावत होता. पण या लॉकडाऊननंतर महागाईला तोंड द्यावे लागणार हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नव्हती. कातरवेळ टळून गेली होती, या वर्क फ्रॉम होममुळे कामाचे तास अनियमित झाले होते, कधीकधी, अं.... कधीकधी नाही दररोज काम तास-दीड तास तरी जास्तच व्हायचं, पण कामात गती मात्र नसायची. असो आता गतीने रात्रीच्या जेवणासाठी गडबड सुरू झाली, रात्रीही आम्ही दुपारप्रमाणे साधासोपा बेत केला, नारळाच्या खोबऱ्यापासून सोलकढी बनवली, दोघांचे एकत्र जेवण झाले. आज मात्र आम्ही मैफिल सजवली, पण पत्त्यांची नव्हे कॅरमची, मला तसा जमत नाही, पण खेळायचो... सुधीर तर चॅम्पियन, बराच वेळ खेळलो, शेवटी काकांना लवकर झोपायची सवय, त्यांना एक दोन जांभया आल्यावर आम्ही खेळ थांबवला. या लॉकडाऊनमध्ये अजून एक अविस्मरणीय रात्र अलगद विरून जात होती...


Rate this content
Log in