pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी - सातवा दिवस

लॉकडाऊन डायरी - सातवा दिवस

1 min
285


प्रिय डायरी,

         आज सातवा दिवस. सकाळी उठल्या उठल्या आवरायचे घाई असते पण आता उठताच मोबाईल घेऊन बसलं तरी काळजी नसते. आजचा नाश्ता आणि सोबत कोरोनाच्या बातम्या! हल्ली सकाळ जरा उशिरा होते माझी आणि त्यामुळे दुपार लवकर! 


दुपारी जेवण झाले. एक जुना बॉक्स घेतला. त्यात चाळून मऊ मऊ माती भरली आणि झाडे लावली. बिया घरातच मिळाल्या. कुठल्या होत्या कळले नाही पण पेरल्या. मेथीचे दाणे घरात असतातच. ते पेरले. माती ओलसर केली. हाताने मातीत बिया रुजवताना लहानपणी माती खेळतानाची आठवण झाली. आता रोज त्यांची निगा राखणार.

रात्रीच जेवण झाल्यावर जरा घरी बसून करता येतील अश्या आयडिया मिळतात का पाहू म्हटलं. तेच शोधत होते. पण आता झोपायलाही हवं. शुभ रात्री.


Rate this content
Log in