pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #42

लॉकडाऊन डायरी #42

1 min
271


प्रिय डायरी,

         आज बेचाळिसावा दिवस. सकाळी डोळे उघडेचनात. झोप पूर्ण झाली नाही. पण मग 'पूर्ण दिवस आहे की झोपायला', असा विचार करून अंथरून सोडलं. मग नाश्ता आणि फक्कड चहा.

दुपारी चण्याची आमटी बनली होती. सोबतीला बाजरीची भाकर. मग काय बेत छान जमला. आणि मग सकाळी ठरल्याप्रमाणे दुपारी झोप घेतली. नंतर एकदम ताजतवानं वाटत होतं. हल्ली गांधीलमाश्या दिसतात. शोध घेतला तर कळलं की गांधीलमाश्यांनी छोटंसं पोळ बनवलं आहे. 

तहान तर काय भागत नाहीच. मग लिंबू सरबत कामी येतं. संध्याकाळी बाहेर बसल्यावर बरं वाटतं. तापलेली धरणी शांत झालेली असते.

आता जेवण झालं आहे. आज उल्का वर्षाव होणार असं कळलं. मध्यरात्री जागून पाहण्याचा विचार आहे. पाहू काय होतंय. शुभ रात्री!


Rate this content
Log in