लॉकडाऊन डायरी #36
लॉकडाऊन डायरी #36
प्रिय डायरी,
दिवस छत्तीसावा. आज सकाळच्या नाश्त्यात मी रात्रीचाच भात खाल्ला. कारण आज काय भूक लागलीच नव्हती. मग असाच कुठे विडिओ बघ, टीव्ही बघ करत टाईमपास केला.
दुपारी मात्र भूक लागलेली मग मस्त जेवण केलं. अभ्यास केला. कारण परीक्षांबाबत स्पष्ट निर्णय अजूनही काय होतोय हे समजत नाही आहे.
थोडासा सिनेमा पाहिला तोवर चहाची वेळ झाली. आज व्यायामाला सुटी दिली. आणि मग चित्रकला! पुन्हा भूक लागली म्हणून मॅगी खाल्ल्ली. वातावरणात विविध रंगांची उधळण झालेली. पावसाचे ढग आणि लाल, पिवळा, केशरी रंग त्यात भरलेले दिसत होते. आज येणारी उल्का पृथ्वीच्या जवळून गेली. वाचलोच आपण! पण जर ती उल्का धडकली असती तर ना कोरोना ना लॉकडाऊन आणि ना ही सगळ्याचं कारण बनलेला माणूस राहिला असता!
रात्रीचं जेवणही आता झालंय. आता पुन्हा मोबाईल वर मेसेजना उत्तरे आणि झोपणे. हल्ली तेवढं तरी करता येतंय हेही नसे थोडके. शुभ रात्री!