STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #33

लॉकडाऊन डायरी #33

1 min
352


प्रिय डायरी,

         आज तेहतिसावा दिवस. उठून झटपट आवरलं. खूप छान वातावरण होतं. खुर्ची टाकून अंगणात बसले. झाडे, पक्षी न्याहाळत. ते स्वछंदी विहार करत आहेत आभाळात आणि माणसे घरात बसली आहेत. निसर्ग खुलत आहे आणि नव्या दमाने शुद्ध श्वास उरात भरून घेत आहे. खरंच, माणसाने किती घात केला आहे पर्यावरणाचा आणि शांत बसला ते पण विषाणू आला म्हणून नाहीतर अजूनही चालूच राहिलं असतं निसर्गाला ओरबाडणं. ओझोनचा थर दुरुस्त होत आहे, जागतिक तापमान वाढ घटली आहे. निसर्गाच्या दृष्टीने हा विषाणू वरदान आहे.

असे विचार चाललेच होते की आईने जेवायला बोलावले. गरम गरम भातावर घरच्या साजूक तुपाची धार नि मसाले भाताचा सुवास! पोट गच्च भरलं. 

रात्री भरली वांगीची भाजी बनली होती. मी तर आडवा हात मारलाच. आणि मग थोडा टीव्ही पाहिला आम्ही सगळ्यांनी मिळून. आता झोप! शुभ रात्री!


Rate this content
Log in