लॉकडाऊन डायरी #39
लॉकडाऊन डायरी #39
प्रिय डायरी,
दिवस एकोणचाळिसावा. जाग तर लवकर आलेली पण तरीही उठायला उशीर झालाच. सकाळपासूनच गरम होतं होते. आवरून मग बाहेरच्या हवेमध्ये बसलो. घामाच्या धारा चाललेल्या होत्या.
दुपारचं जेवण झालं आणि मग आम्ही व्हिडिओज पाहिले. पावसाचे ढग जमा झालेले परंतु पाऊस झाला नाही. उष्णता मात्र वाढली.
संध्याकाळी पाणी आलं. मग ते भरून ठेवण्याची धावपळ सुरु झाली. पाणी गेल्यावर थकलेलं-भागलेलं मन चहाने तृप्त झालं.
रात्रीचंही जेवण आता झालंय. आणि आता पुन्हा झोपायची वेळ! शुभ रात्री, माझ्या प्रिय डायरी!