लॉकडाऊन डायरी #35
लॉकडाऊन डायरी #35
प्रिय डायरी,
दिवस पस्तीसावा. सकाळी चहा नाश्ता झाला आणि आईला स्वयंपाकाला मदत केली. आज माझ्या आवडीची मोदकाची आमटी बनणार होती. मग काय स्वारी खूषच! चमचमीत आणि चवदार भाजी खाऊन मन जाम खूष झालं.
दुपारी अभ्यास झाला आणि निळ्या निळ्या आकाशाखाली ढगांमध्ये निरनिराळे आकार शोधण्यात मन गुंग झालं. मोकळा वारा आणि ऊन-सावलीचा लपाछपीचा खेळ चालू होता. पुस्तक वाचलं. सिनेमा पाहिला.
रात्री बातम्या पहिल्या आणि मग पुन्हा जेवण. हल्ली दुसरं काय रुटीन आहे म्हणा. आता झोपायची तयारी.
शुभ रात्री.