लॉकडाऊन डायरी #38
लॉकडाऊन डायरी #38
प्रिय डायरी,
दिवस अडतिसावा. लवकर उठल्यामुळे कोवळे ऊन अनुभवायला मिळाले. नाश्ता झाला आणि मग अभ्यास.
दुपारी मैत्रिणीशी फोन वर गप्पा झाल्या. जेवण झालं आणि मग सगळ्यांना लॅपटॉप वर विडिओ दाखवले. एक झोप काढली आणि चहाच्या वेळेला सगळे उठून सज्ज झालो!
आणि मग ती बातमी आली.... लॉकडाऊन वाढल्याची! आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मला तर वाटते महिनाभर एकदाच वाढवावा. जवळ आला संपण्याचा दिवस असे म्हणता म्हणता पुन्हा लांब जातोय! असो, जे काही होत ते चांगल्यासाठीच असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं.
रात्रीच जेवण झालं. आता झोपायची तयारी. शुभ रात्री.