pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #34

लॉकडाऊन डायरी #34

1 min
258


प्रिय डायरी,

         दिवस चौतिसावा. रात्री एकदम गाढ झोप लागली होती. त्यामुळे आज सकाळी उठून मस्त वाटत होतं. एकदम प्रसन्न. नाश्ता झाला आणि मग अभ्यास करायला घेतला. 

दुपारी शेवग्याच्या शेंगांची मसालेदार, चमचमीत रस्सा भाजी खाल्ली. थोड्या पदार्थांमधूनही चविष्ट पदार्थ बनवता येतात हे लॉकडाऊनमुळे शिकायला मिळतंय. असे अनेक लोक आहेत ज्यांना आतातर एक वेळच जेवणही मिळणं मुश्किल झालं आहे. आणि ज्यांना मिळतंय त्यांनी उधळपट्टी करायची गरज नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढायचं आहे. 

दुपारी मग सिनेमा पाहिला. इंसेप्शन, एक नंबर आवडता सिनेमा. कितीतरी पारायणे केलीत त्याची. आणि मग नंतर चहा पिल्यावर मांजरांसोबत खेळणं झालं. त्यांनाही सवय झाली आहे आता.

रात्री बटाटा आणि बेसन बनवलं होतं आईने. आवडत सगळं मग मस्तच जेवण झालं. आता झोप. शुभ रात्री!


Rate this content
Log in