लॉकडाऊन डायरी #41
लॉकडाऊन डायरी #41


प्रिय डायरी,
आज एकेचाळिसावा दिवस. आवरून मस्त नाश्ता केला. आई सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. ती आल्यावर मग काय काय आणलंय हे पाहण्याचं घाई झालेली. कारण एकदा एक माणूस बाहेर गेलं की त्याने सगळं काम करून यावं असंच सध्या होत आहे.
दुपारी अजिबात वारा वाहत नव्हता. उष्णतेने घामाच्या धारा वाहत होत्या. आणि त्यात गरम गरम जेवण! दुपारी फारसं काही करण्यासारखं नसतंच हल्ली. मजेशीर व्हिडिओज पाहून मनोरंजन होतं, तेवढं तरी बरं आहे.
संध्याकाळी मात्र वेळ बरा जातो. व्यायाम करून झालं की जाम भूक लागते. आणि आज तर माझ्या आवडीची बटाटा भाजी बनवलेली मी. मग तर जेवण मस्तच झालं. आता थोडा मोबाईल वर टाइमपास आणि मग झोपणे. शुभ रात्री!