STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

लॉकडाऊन डायरी #8

लॉकडाऊन डायरी #8

1 min
250

प्रिय डायरी,

         आज आठवा दिवस. सकाळी सकाळीच गाडीवर loud speaker वरून होणाऱ्या सूचनांनी जाग आली. पाहिलं तर वाजलेले ६.३०. एवढ्या लवकर उठणे नकोच वाटले आणि त्यात थंड हवा. कशीबशी पुन्हा झोप लागली तर पुन्हा घरातल्या महिलामंडळाच्या गप्पांनी जाग आली. आता म्हटलं उठूयाच. आले घातलेला चहा पिऊन मस्त फ्रेश झाले.

काल लावलेल्या बियांना पाणी दिलं. मोबाइलला वर गेम खेळता खेळता दुपार कधी झाली कळलेच नाही. जेवण झाल्यावर थोडीशी झोप काढूया म्हटलं तर थोडी झोप अगदी सहा वाजेपर्यंत गेली. आज १ एप्रिल. एप्रिल फूल्स डे. एरवी समाज माध्यमे अफवा आणि खोट्या गोष्टींनी ओसंडून वाहिली असती; परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांमुळे आज सगळंच वातावरण थंड होते. नसत्या अफवा पसरून जनता घाबरून जाऊ नये म्हणून हा उपाय होता . 

रात्री मसाले भाताचा बेत होता. म्हटलं जरा sketching करूया. मग स्वतःचंच चित्र काढत बसले. त्याला उद्या रंगवते. तर माझ्या प्रिय डायरी, आता शुभ रात्री! 


Rate this content
Log in