लॉकडाऊन डायरी #6
लॉकडाऊन डायरी #6


प्रिय डायरी,
आज सहावा दिवस. आज जरा लवकर जाग आली. असं वाटतंय की सकाळी लवकर उठणे चालू करावे. निदान सूर्योदयाचे सौंदर्य तरी पाहता येईल. सकाळचे कोवळे ऊन अनुभवता येईल. एरवी दुपारी उन्हाने काहिली होतेच.
आज जरा साबणाचे फुगे उडवण्याची हुक्की आली. मग काय आले माझ्या मना तिथे कोणाचे काही चालेना! घरभर फुगेच फुगे करून ठेवले. अर्थात नंतर सगळे साबणाचे पाणी मलाच साफ करावे लागले. आज म्हटलं शिन चॅन पाहूच. मग काय लावला टीव्ही. आणि जेवता जेवता बाकीचे पण हसू लागले.
रात्री कोथिंबिरीच्या वड्यांचा बेत जमला. मग काय जेवणाला मज्जा आली. चित्रकला करावी म्हटलं. हौसेने बनवलेलं sketchbook बाहेर काढलं. जरा आडव्या तिडव्या रेषा मारल्या. अगदी मन भरेपर्यंत. शेवटी मग झोप यायला लागली आहे. आता थांबते. भेटते उद्या. शुभ रात्री.