लॉकडाऊन डायरी #5
लॉकडाऊन डायरी #5
प्रिय डायरी,
दिवस पाचवा, रविवार. आज तर भाजीवाल्यांच्या आवाजानेच जाग आली. लॉकडाऊनमुळे आता भाजीवाले दारोदार जातात. त्यामुळे भाजीवाले आले नि घरात धावपळ सुरु झाली आणि माझी झोपमोड झाली. पण आपला निर्धार पक्का! पांघरून ओढून पुन्हा एक झोप काढलीच.
आमच्या घरापुढे भरपूर झाडे आहेत. सफरचंदाचेही झाड आम्ही लावले आहे आणि त्याला फळेही येतात. फळाफुलांची भरपूर झाडे आहेत. त्यांचं निरीक्षण करण्यात आणि छोट्या छोट्या, अवकाळी पावसाने पडलेल्या कैऱ्या वेचण्यात आजची दुपार भुर्र्कन निघून गेली.
थोडा अभ्यासही करावा म्हणून इंटरनेटवर जरा सर्फिंग केली. खरेतर वर्षाच्या ह्या काळात आम्ही मुले अभ्यासच करत असतो; पण कोरोनाने सुट्टी दिली.
रात्री मस्त अंडा करी खाल्ली. पावसाने हजेरी लावलेलीच. विजांचा गडगडाट, जोरात हवा यामुळे टीव्ही नाही लावला. मग काय निजाय नमः! हवेतल्या गारव्याने झोपही छान लागेल. माझ्या प्रिय मैत्रिणी आता आपण भेटूया उद्या. पाहू काही नवीन गोष्टी मी करते का!