लॉकडाऊन डायरी #4
लॉकडाऊन डायरी #4
प्रिय डायरी,
दिवस चौथा, शनिवार. एरवी उद्या रविवार म्हणून आनंद झाला असता, पण आता तर सारेच दिवस जणू रविवार झाले आहेत. तरीही एकंदरीत कॉलेज नाही, काम नाही. सगळेच जण फक्त आराम करत आहेत. मजेशीरच होतंय नाही.
तर माझ्या प्रिय डायरी, आजच्या दिवसाची सुरुवातही काही नवी नाही झाली. तेच उशिरापर्यंत झोपणे नि मग नाश्ता नि परत बसून राहणे. सकाळपासूनच पावसाचं वातावरण आहे. ढाल वातावरणाने अजूनच उदासीनता दाटली कि काय असं वाटतंय
आज दुपारचं जेवण नकोच म्हटलं. खाऊन नुसतं बसायचं; नो काम, ओन्ली आराम. पोटही जडजड वाटत होतं. मग पोटालाही विश्रांती देऊया म्हटलं. आज औषध फवारणीवाले आले होते. औषध फवारले नि पाऊस आला. आता याला काय म्हणावे.
संध्याकाळी चहा झाला नि शेजचा मांजरांसोबत खेळण्यात वेळ गेला. थोडा व्यायामही झाला. रात्री तर सपाटून भूक लागलेली. मग काय मस्त आडवा हात मारला जेवणावर. मग थोडी शतपावली. आता झोपायची तयारी करतेय. उद्या पुन्हा भेटू. शुभ रात्री.