लॉकडाऊन डायरी #32
लॉकडाऊन डायरी #32
प्रिय डायरी,
आज बत्तीसावा दिवस. आज तर नाश्त्याला पावभाजी बनवली होती. आपली आवडती. मग काय प्रेरणाच मिळाली झोपेतून जागे व्हायला. आज आई दुकानात गेली. आता असं झालाय की खूप दिवसांतून कधीतरी बाहेर पडायचं आणि हव्या त्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू एकदाच घेऊन यायच्या.
दुपारी पण मी पाव भाजीच खाल्ली. पण बिना पाव. पाव तर मिळाले नव्हतेच दुपारपर्यंत. संध्याकाळी मिळाले. पण तोवर तर अजून काही खाण्याची इच्छाच नव्हती.
मग आज भरपूर व्यायाम केला. कसरत केली. सुंदर वातावरण होतं आज. निरभ्र आकाश आणि हिरव्या हिरव्या झाडांवर पडलेले पिवळंधम्मक ऊन!
रात्री टीव्ही पाहता पाहता जेवण झालं. एप्रिल महिनाही संपत आला आहे पण कोरोना काय जायचं नाव घेईना. पुढे कसं होईल याची कल्पना न केलेलीच बरी!