लॉकडाऊन डायरी #31
लॉकडाऊन डायरी #31


प्रिय डायरी
आज एकतिसावा दिवस. नाश्त्याला कोबीची भाजी बनवली होती; पण मी त्यात माझा ट्विस्ट आणला. दुपारपर्यंत मग मोबाइल वर वेळ गेला. आणि मग जेवून अभ्यासाला बसले. जोरात वारा वाहत होता आणि त्यातच झोप लागून गेली.
आज दिवसभर टीव्हीला आराम दिला. तेच तेच पाहून कंटाळा आला आहे आता. संध्याकाळी मात्र मांजरांसोबत मनसोक्त खेळणं झालं. आणि मग व्यायाम. नंतर मस्त शिरा खाल्ला. आणि रात्री जेवायला मी वाटाण्याची भाजी बनवली. मस्त बनलेली. आता झोपायची तयारी. शुभ रात्री.