लॉकडाऊन डायरी #30
लॉकडाऊन डायरी #30
प्रिय डायरी,
आज तिसावा दिवस. कोरोनाग्रस्तांची संख्या काय कमी व्हायचं नाव घेत नाही. असं वाटतंय की ३ मेपर्यंत लॉकडाऊन पुरेसा ठरणार नाही. शिस्तीची पालन न करणे आणि उतावीळपणा ह्यामुळे सारं घडत आहे. काही लोकांमुळे घरात बसलेल्या लोकांच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्यासारखं होतंय.
आज सकाळी लवकर उठणं झालं. मग अभ्यास. घरात आज डाळीचे लाडू बनले. आणि मग दुपारच्या जेवणात जरा ट्विस्ट म्हणून कोबीची भाजी जरा हटके बनवली. आणि आवडता बटाटा तर होताच.
रात्री फारशी भूक नव्हती म्हणून जरा कमी खाणं झालं. पावसाळी ढग आले आहेत. गार वाराही सुटला होता. पाऊस यावा असं तर दुपारीच वाटत होतं कारण खूप उष्णता होती. पण रात्रीच येतो की काय पाऊस असं वाटतंय. प्रिय डायरी, तुझीही आता सवय होऊन गेली आहे. दिवस अखेर तुला सगळं सांगितल्याशिवाय दिवस पूर्ण झाला असं वाटतच नाही. अजून बरेच दिवस आपण सोबती असू. पण आतासाठी शुभ रात्री!