लॉकडाऊन डायरी #3
लॉकडाऊन डायरी #3
प्रिय डायरी,
चला, आज तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळच्या फक्कड चहाने दिवसाची सुरुवात मस्तच झाली. छान आवरून झाल्यावर कविता लिहावीशी वाटली. जवळपास सगळेच बाइथे खेळ खेळून झालेलं आहेत तर म्हटलं चला शब्दांशी खेळूया. लागलीच डायरी न पेन घेतला न वेळ न दवडता जे सुचेल तसे लिहून काढले. नंतर जुळवाजुळव करून एक कविता तयार केली.
कोरोना विरोधात
युद्ध जिंकूया
संयम राखून आता
मानवजात वाचवूया
घाबरून जाऊन कधी
काही साध्य होते का
योग्य माहिती घेऊन
शाहनपणाने वागा जरा
आपण राखू स्वच्छता
शिकवू दुसऱ्य
ालाही
स्वच्छ करू देश नि
स्वच्छ ठेवू पृथ्वी ही
दुपारच्या जेवणात झणझणीत वांगयचे भरीत आणि बाजरीची भाकरी असा खमंग बेत होता. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवण झालं. नंतर आईला कामात मदत! घरात थोडीशी आवराआवर केल्यावर साऱ्यांनीच झोप काढली. आज दुपारी ढगाळ वातावरण तर तयार झालेलेच पण त्यानंतर जोरदार पाऊसही येऊन गेला. जो संध्याकाळपर्यंत चालू होता. हवेत गारवा निर्माण झाला नि लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा थोडावेळ विसर पडला . त्यानंतर मैत्रिणीचा फोन आला नि गप्पा रंगल्या.
रात्रीच जेवण झाल्यावर जुना हिंदी सिनेमा पाहण्याची हुक्की आली आणि सगळ्यांनी एकत्र बसून पूर्ण सिनेमा पाहिला.
आता उद्याचा दिवस काय घेऊन येतो काय माहित. भेटू उद्या.