लॉकडाऊन डायरी #29
लॉकडाऊन डायरी #29


प्रिय डायरी,
आज एकोणतिसावा दिवस. पाहता पाहता महिना होत आला. दिवस खूप पटपट जात आहेत असं वाटतंय. करायला काही नाही फक्त उठा, जेवा आणि झोपा! म्हणून फार वेगाने वेळ जातोय असं मला वाटतंय. पण अनेकांना विरुद्ध वाटत असणार. आणि तेही बरोबर आहे म्हणा.
दुपारी चण्याची आमटी होती. एकदम झक्कास. आणि मी बेसन बर्फी बनवली. त्यात थोडासा वेळ गेला. आणि मग निळ्याशार आकाशाखाली झोप! कापसासारखे पिंजलेले पांढरेशुभ्र ढग आणि थंडाई देणारा वारा! छानच झोप लागली.
संध्याकाळी पाणी भरलं. पाणी टंचाई अल्पशा प्रमाणात जाणवू लागली आहे. मांजरांसोबत मस्ती झाली. आणि मग व्यायाम! सपाटून भूक लागली होती. मग आईने फोडणीची पोळी बनवली. आपली संस्कृती सांगते अन्न वाया घालवू नये कारण ते पूर्णब्रह्म आहे. आणि घराघरात गृहिणी ह्याची काळजी घेत असतात.
रात्रीचेही जेवण झाले आहे. आणि आता आराम! आराम कधी कोणाला चुकलाय! सध्यातरी असंच म्हणावे लागेल! शुभ रात्री!