लॉकडाऊन डायरी #28
लॉकडाऊन डायरी #28


प्रिय डायरी,
आज अठ्ठाविसावा दिवस. उठून आज लवकर आवरलं. आज मी बॉक्समध्ये लावलेली रोपे जमिनीत लावली. कारण आता ती वाढायला लागली आहेत. आणि नेहमी पाणी घालून खोकेसुद्धा फाटायला लागले होते. म्हणून अंगणात लावली.
दुपारी भरपेट जेवण झाल्यानंतर झोप तर लागणार होतीच. पण झोपायचं नव्हतं म्हणून मग आधाराला घेतला मोबाईल. विडिओ पाहून वेळ घालवला. संध्याकाळी मग गंमत म्हणून मॅगी बनवली. तिखट बनवली मुद्दाम. आणि नंतर मात्र पश्चाताप करण्याची तर वेळ येणार नाही ना असं वाटलं;पण बरं झालं फार तिखट झाली नाही.
आणि मग रात्रीच्या जेवणाला भूक कुठेय! पण चविष्ट तर होतंच जेवण. त्यानंतर टीव्ही पाहिला. रात्री बरेचसे दोस्तलोक ऑनलाईन येतात. मग ल्युडो खेळायचा प्लॅन आहे. आणि नंतर अर्थात झोप.