लॉकडाऊन डायरी #27
लॉकडाऊन डायरी #27


प्रिय डायरी,
आज सत्ताविसावा दिवस. पहाटेच जाग आली होती. पण उठायचा कंटाळा . खिडकीतून बाहेर अंधार असल्याचे दिसत होते. म्हणून पुन्हा झोपून घेतलं तर नंतर जाम उशीर झाला उठायला! मग झाली घाई.
दुपारी मी भाजी बनवली. कारण बाकीचे सदस्य शंकरपाळे बनवण्यात व्यस्त होते. भरली भेंडीची भाजी सगळ्यांनाच खूप आवडली.
ऑनलाईन ल्युडो गेम दोस्तांबरोबर खेळायला घेतला. मग वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यात बऱ्याचदा जिंकल्यामुळे मला आनंद तर होणार होताच. आज मी जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. एखादी नवीन भाशा शिकण्यात मजाही आहे आणि गरजेचेही आहे.
रात्रीचं जेवण झालं नुकतंच. आता थोडी शतपावली आणि मग नंतर झोपायची तयारी. शुभ रात्री!