लॉकडाऊन डायरी #26
लॉकडाऊन डायरी #26


प्रिय डायरी,
आजचा दिवस सव्वीसावा. किती पटापट दिवस जात आहेत हे मान्य करावंच लागेल. हेही दिवस जातील. फक्त विश्वास आणि धैर्याची गरज आहे. आज ऍनिमेटेड फिल्म पाहिली. अश्या फिल्म पाहिल्या की मन ताजेतवाने होते. असं नाही की कार्टून हे केवळ लहान मुलांसाठीच असते. अनेकदा कार्टूनमधून खूप चांगले संस्कार केले जातात. दुपारी जेवण झाले आणि सगळे हवेसाठी बाहेर बसलो. हवेच्या गार झुळूकेने झोप लागून गेली. ती थेट संध्याकाळीच जाग आली.
रात्री पुन्हा वारा सुटला आहे. जेवण होऊन आता झोपायची तयारी चालू आहे.