लॉकडाऊन डायरी #25
लॉकडाऊन डायरी #25


प्रिय डायरी,
आज सकाळी लवकर जाग आली. सकाळी लाईट गेली होती. आज खूप दिवसांतून भेंडीची भाजी खायला मिळाली. लॉकडाऊनमुळे बाजार बंद असतो पण भाजीवाल्याकडे मिळाली. ताजी ताजी खूप चविष्ट होती. हल्ली घरात मुंग्या खूप दिसतात. बाहेरही. त्यांनाही माहित असेल की पाऊस लवकरच सुरू होणार आहे मग त्याची तरतूद आधीच करून घ्या. आज थोडा अभ्यास केला आणि सिनेमा पहिला.
रात्री कोथिंबिरीच्या वड्या आणि वरण भातावर साजूक तुपाची धार आणि मग जेवणाची लज्जत तर वाढणारच ना! त्यानंतर यू ट्यूबला व्हिडिओ पाहिले आणि मग झोपायची तयारी.