लॉकडाऊन डायरी #24
लॉकडाऊन डायरी #24
प्रिय डायरी,
आज चोविसावा दिवस. प्रेरणादायी विडिओ पाहत आज सकाळची सुरुवात झाली. मन स्थिर झाले आणि आपणही प्रत्येक दिवस धमाकेदार जगला पाहिजे असं वाटलं.आज ताईचा वाढदिवस. तिला शुभेच्छा दिल्या. आम्हां दोघींचेही वाढदिवस लॉकडाऊनमध्ये आले. पण वाढदिवस साजरा करण्यापेक्षाही आता घरात थांबणे अधिक योग्य आहे हे आम्ही जाणतो. दुपारी मी फक्त भात खाल्ला. भूक तर फारशी लागत नाहीच. मग एक सिनेमा घेतला पाहायला. हॉलीवूडचा. करमणुकीसोबत विचार करायला लावणारा.
आज उष्णता पुन्हा वाढली. पावसाचा इशारा तर दिलेला आहेच. लवकरच पुन्हा पाऊस सुरु होईल.
रात्री जेवायला माझ्या आवडीचा बटाटा रस्सा बनवला होता. मग काय स्वारी खूश! आणि आता झोप! तर माझ्या प्रिय डायरी, शुभ रात्री!