लॉकडाऊन डायरी #23
लॉकडाऊन डायरी #23


प्रिय डायरी,
आज तेवीसावा दिवस. आज सकाळची सुरुवात थोडी दिलासादायक बातमीने झाली. कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट होत आहे आणि मृत्युदरही कमी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कोरोना आटोक्यात येत आहे.
दुपारी हरभरा आमटी आणि बाजरीची भाकरी खाऊन मन तृप्त झालं. मला भाकर चुरून खायची सवय आणि झणझणीत कालवण म्हटल्यावर तर चांदीच झाली! पोट तुडुंब भरलं. मग थोडं वाचन आणि वामकुक्षी.
संध्याकाळी चहा झाल्यावर मांजरांशी थोडं खेळणं झालं. मग व्यायाम. आणि मॅगीने छोटी भूक भागवली.
रात्री जेवणात मसालेभात जिभेचे चोचले पुरवायला तयार होता. आता मात्र डोळे पेंगुळले आहेत. तर माझ्या प्रिय डायरी, शुभ रात्री!