लॉकडाऊन डायरी #22
लॉकडाऊन डायरी #22


प्रिय डायरी,
आज बाविसावा दिवस. दिवस सुरु झाला. नाश्ता झाला आणि झाडांना पाणी दिलं. अभ्यास करण्याचा जाम मूड होता पण तो ओसरला. एवढे दिवस लॉकडाऊन पुन्हा वाढल्यामुळे परीक्षा कशा होतील काय माहित!
दुपारी जरा वारा सुटला होता. वाढत्या उष्णतेला त्याने थोपवले. जेवण झाल्यानंतर आईने लाडू बनवण्याच्या कामाला हात घातला. रव्याचे लाडू बनवताना मी कितीतरी मटकावले! गव्हाला ऊन देण्यासाठी वाळत घातले होते. मी तर ३० किलोचे पोते उचलले! अर्थात थोडंसच अंतर; पण व्यायाम करण्याचा फायदा तर झाला!
रात्री भरली वांगी आणि बाजरीची भाकर असा झक्कास बेत जमून आला. आता जेवून तृप्त झाल्यावर झोप तर येणारच की! शुभ रात्री!